ब्लॉग

Zoom व्हिडीओ कॉलिंगला टक्कर देण्यासाठी Facebook ने लॉन्च केली नवी सर्विस

कोरोना व्हायरसमुळे अनेक देशांमध्ये लॉकडाऊन जारी करण्यात आला आहे. अशातच अनेक लोक घरांमध्ये बंद आहेत. त्यामुळे अनेक लोक सोशल नेटवर्किंग साइट्सचा जास्त वापर करत आहेत. तसेच अनेक व्हिडीओ कॉन्फरन्सिंग अॅप्सचाही वापर केला जात आहे. लॉकडाऊनमुळे अनेक लोक वर्क फ्रॉम होम करत आहेत. त्यामुळे ऑफिसच्या कामासाठी किंवा मित्रमंडळींशी कनेक्ट राहण्यासाठी झूम आणि इतर अॅप्सचा अनेकजण वापर करत आहेत. अशातच फेसबुकही आपल्या युजर्ससाठी एक फिचर घेऊन आलं आहे. ग्रुप व्हिडीओ कॉल करण्यासाठी फेसबुकने एक मेसेन्जर फिचर लॉन्च केलं आहे.

फेसबुक मेसेन्जर रूममध्ये एकाच वेळी 50 लोक जोडले जाणार आहेत. फेसबुक मेसेन्जर रूममार्फत अगदी सहजपणे लोकांशी कनेक्ट होता येणार आहे. एवढचं नाहीतर युजर्सना यातील मेसेंन्जर रूमच्या इन्वाइटला कोणत्याही न्यूज फीड, ग्रुप किंवा इव्हेंटमार्फत शेअर करणं शक्य होतं. यामध्ये युजर्स आपल्या सोयीनुसार रूम क्रिएट करू शकतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, या फिचरमध्ये प्रत्येकाच्याच प्रायव्हसीची काळजी घेण्यात आली आहे.

मॅसेन्जर रूम प्रायव्हसीच्या अंतर्गत युजर्सने क्रिएट केलेली रूम कोण पाहू शकतं यावर पुर्णपणे युजर नियंत्रण ठेवू शकतो. तसेच तुम्ही क्रिएट केलेली रूम लॉक किंवा अनलॉक करू शकता. रूमची लिंक असणारा कोणताही व्यक्ती यामध्ये सहभागी होऊ शकतो. तर इतरांसोबतही रूम शेअर करू शकतो. परंतु, कॉल क्रिएट करण्यासाठी रूम क्रिएटर उपस्थित असणं अत्यंत आवश्यक आहे. या व्हिडीओ चॅटमध्ये कोण सहभागी होणार याचा कंट्रोल रूम क्रिएटरकडे असणार आहे.

रूम क्रिएटरजवळ कोणत्याही युजरला या चॅटमध्ये सहभागी करण्याची किंवा चॅटमधून काढून टाकण्याचे अधिकार असणार आहेत. लोक फेसबुकच्या नियमांचं उल्लंघन करण्यासाठी या रूमला रिपोर्टही करू शकतात. त्यानंतर नियमांचं उल्लंघन करणारा युजर व्हिडीओ किंवा ऑडिओ कॉलमध्ये सहभागी होऊ शकणार नाही.