ब्लॉग

खरंच लॉकडाऊनमुळे ओझोनचं छिद्र पुर्णपणे बुजलंय का? जाणून घ्या सविस्तर!

जगभरात सध्या कोरोना व्हायरसने थैमान घातलं आहे. आत्तापर्यंत जगभरात 29 लाख लोकांना कोरोनाची लागण झाली असून 6 हजार लोकांचा मृत्यु झाला आहे. त्यामुळे कोरानाचा संसर्ग रोखण्यासाठी पंतप्रधानांनी देशात लॉकडाऊनच्या सूचना दिल्या. सध्या तिसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊन चालू आहे. देशात अशा प्रकारची परिस्थिती असताना आपल्या पृथ्वीवरील वाढत चाललेल्या ओझोन थराची वाढ कमी झाली असल्याचं बोललं जात आहे. यासंदर्भात आपण जाणून घेणार आहेत.

ओझोन वायू आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे. कारण सुर्याची पृथ्वीची किरणे पडतात ती खूप प्रखर असतात. ही किरणे आपल्याला घातक असतात. मात्र पृथ्वीच्या आणि सुर्याच्या मध्ये ओझोन वायूचा थर असतो. हा वायू सुर्याची पृथ्वीवर येणारी किरणे योग्य प्रमाणात पाठवतो. पहिली किरणे ओझोन वायूवर पडतात तिथून ही किरणे योग्य प्रमाणात पृथ्वीवर पाठवण्याचं काम ओझोन वायू करतो.

काही दिवसांपुर्वी ओझोन वायूच्या थराला एक छिद्र पडलं होतं. त्यामुळे भविष्यात खूप मोठा धोका होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र आता ओझोन थरामध्ये पडलेले छिद्र पूर्णपणे बुजले असल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे.

उत्तर ध्रुवावर आर्क्टिकवर ओझोन थराच मोठं छिद्र पडलं होतं. तसेच मागील महिन्यात या छिद्राने प्रचंड मोठा आकार घेतला होता. हे छिद्र दक्षिणी गोलार्धात पोहोचू शकेल अशी भीती देखील शास्त्रज्ञांनी व्यक्त केली होती. मात्र आता ते छिद्र पूर्णपणे बंद झाल्याचे कॉपरनिकन ॲटमॉस्फियर ऑब्झर्वेशन सर्व्हिसने सांगितले आहे. तसेच लॉकडाऊनमुळे हे छिद्र बुजलं असल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र शास्त्रज्ञांनी हा दावा फेटाळून लावला आहे.

लॉकडाऊनमुळे कमी झालेल्या प्रदूषणाचा यामध्ये काहीही संबंध नाही. एप्रिलपासून उत्तर ध्रुवाचं तापमान वाढू लागते. त्यामुळे स्ट्रॅटोस्फेरिक थर गरम होण्याचे प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात वाढते. यामुळे ओझोन थरावरील छिद्र बंद झालं असल्याचं शास्त्रज्ञांनी सांगितलं आहे.

क्लोरोफ्लोरोकार्बन्स (CFCs)मुळे या थराचं नुकसान होत होतं. फ्रिज, एसी, फोम आदींमध्ये क्लोरोफ्लोरोकार्बन्स असतो. 1985मध्ये दक्षिण ध्रुवावर ओझोनच्या थराला मोठं छिद्र पडल्याचं दिसून आलं होतं.

1990च्या दशकात जवळपास ओझोनच्या थरात 10 टक्के घट झाल्याचे दिसून आले होते. त्यानंतर मॉन्ट्रियल प्रोटोकॉल हा करार आकाराला आला. यामध्ये उद्योगांनी पर्याय शोधण्याचं मान्य केले. 180 देशांनी या करारावर सह्या केल्या होत्या. या देशांनी क्लोरोफ्लोरोकार्बन्सच्या वापरावर निर्बंध घालण्याचं मान्य केले. 2000पासून दर दशकात 3 टक्के इतकी ओझोनमध्ये सुधारणा झाली आहे.