ब्लॉग

आतासारखीच 1897 सालीही झाली होती परिस्थिती; वाचा शाहू महाराजांच्या आदेशाचं पत्र

पुर्वी अनेक साथीचे रोग यायचे त्यामध्ये मोठ्या प्रमाणात लोकांना आपला जीव गमवावा लागायचा. त्या काळात आत्ताप्रमाणे चांगल्या दर्जाच्या वैद्यकीय सोई-सुविधा नव्हत्या. त्यावेळी अठराव्या शतकात प्लेगची साथ आली होती. त्यामध्ये आपल्या देशात मोठी महामारी झाली होती. त्यामुळे तेव्हा शाहू महाराजांनी एक पत्राद्वारे ज्योतिबादेवाची डोंगरावरील यात्रा रद्द केली होती. महाराजांचे ते पत्र आत्ता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

जोतीबाची यात्रा बंद केल्याबद्दल

नं बर 75 सर्व लोकस कळवण्याकरिता ह्या जाहीरनाम्यानें प्रसिद्ध करण्यांत येते कीं, प्रस्तुत मुंबई, पुणे वगैरे बऱ्याच ठिकाणी प्रंषिक संनिपात तापाचा आजार (ब्युबॅनिक प्लेग) सुरू असून कांहीं ठिकाणीं पटकीचे आजाराचीही सुरूवात झाली आहे. व शिवाय दुष्काळचे कारणाने वैरणीची तूट सर्वत्र असून ती फार महाग मिळते व कोठें कोठें मूळींच मिळत नाहीं, या सर्व कारणांकरितां येतया चैत्र शुद्ध 15 रोजी कोल्हापूरनजीक वाडी रत्नागिरी उर्फ जोतीबाचे डोंगरावर होणारी श्री केदारलिंगी  यात्रा यंद करण्यांत आली असून तेथे कोणाही यात्रेकरूस दिले जाणार नाहीं.

श्री जम्नमहाराज छत्रपती साहेब सरकार करवीर यांचे आदेशावरून, M. KUVARJI दिवाण सरकार करवीर

वरील पत्रावरून  सोशल डिस्टंसिंगचं महत्त्व त्याकाळीही होतं हे आपल्या लक्षात येईल. त्यामुळे जोतिबाची यात्रा रद्द करण्याचा निर्णय शाहू महाराजांनी घेतला होता.

त्याकाळी परिस्थितीही त्याप्रकारची झाली होती. कारण वैद्यकीय सुविधा आत्ताप्रमाणे उत्कृष्ट नव्हत्या. म्हणजे असं नाही की त्यावेळी उपचारच होत नव्हते उलट त्याकाळी झाडपाल्याची औषधे होती. कोणत्याही औषधाचा साईड इफेक्ट नाही. फक्त इतकच की एखादा नवीन रोग आला की औषध सापडेपर्यंत जास्त काळ जात असे.

प्लेगच्या साथीने संपुर्ण पीढी त्याकाळची  लागली होती. घरातील एक सदस्याचा मृत्यु झाला तर त्याचे अंत्यसंस्कार करून घरी येत नाही तर दुसरा कोणीतरी आपला जीव गमावून बसलेला असायचा. त्यामुळे लोकांनी आपली राहती घरे खाली करून स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला आणि गावच्या गावी खाली झालीत.

काही दिवसांनी आपल्या देशातील जणगणना करण्यात आली तेव्हा मोठ्या प्रमाणात आपली लोकसंख्या कमी झाली होती. आता हळूहळू विकसित झालेल्या तंत्रज्ञानामुळे नवीन आलेल्या रोगांचा सामना आपण मोठ्या हिमतीने करू लागलो आहोत. दरम्यान, आपण लवकरच कोरोनासारख्या विषाणूवर मात करू आणि आपण पुन्हा एकदा रेघरूपेला लागू.