ब्लॉग

अश्या प्रकारे चालू केली इंदुरीकर महारांजानी शाळा आणि हि आहे शाळेची खासियत

निवृत्तीनाथ इंदुरीकर या नावाला महाराष्ट्रात ओळख देण्याची काम नाही. प्रत्येक घरात महाराज आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून पोहचले आहेत. आणि आपणास अनेकांना माहिती आहे कि महाराज कीर्तनाच्या येणाऱ्या पैशातून शाळा चालवितात. परंतु या शाळेची स्थापना कशी झाली या संबंधी इंदुरीकर महाराजांनी आपली प्रतिक्रिया काल वाढदिवसा निमित्त झालेल्या शिर्डी येथील कार्यक्रमात व्यक्त केली.

या कार्यक्रमास पंकजा ताई मुंडे, महादेव जानकर, आ. थोरात, इत्यादी मान्यवर उपस्थित होते. ज्ञानेश्वर माउली सेवाभावी बहुउद्देशीय संस्था स्थापना २००५ मध्ये करण्यात आली. ज्या ठिकाणी शाळा आहे तिथे फक्त दूरवर गोटेच होती या भागात फक्त झाडेच होती. वझर खुर्द आणि वझर बुद्रुक या गावातील लोकांसाठी मुख्यतः हि शाळा सुरु करण्यात आली होती. भाऊसाहेब थोरात यांनी सर्वप्रथम इंदुरीकर महाराजांना २५,००० देणगी देली त्यावेळेस शाळेचा सांस्कृतिक कार्यक्रम होता आणी छोटीशी शाळा होती.

हे २५,००० शाळेची पहिली देणगी होती. सुरवातीच्या काळात महाराज कीर्तनाला जात होते तेव्हा त्यांनी देणगी स्वरुपात शाळेकरिता साहित्य घ्यायचे. या प्रकारे त्यांनी शाळे करिता भौतिक सुविधा उपलब्ध करून घेतल्या. वाघचौरे आणि विखे पाटील यांनी शाळेला २ खोल्या दिल्या आहेत. आणि विशेष म्हणजे या शाळेचे संपूर्ण फर्निचर महाराजांच्या पत्नीने स्वतः कीर्तन करून केलेले आहे.

शाळेमध्ये ११ कम्प्युटर आहे. शाळा संपूर्ण डिजिटल आहे. ५ ते १० पर्यंत एकूण खर्च शाळेत एका विद्यार्थास इथे फक्त २५० रुपये एवढा येतो. इथे चाचणीची फी नाही, दाखल्याची फी नाही किंवा परीक्षा फी सुध्दा नाही. महाराज म्हणतात कि मी असो का नसो या शाळेवर तुमचे प्रेम राहू द्या. या शाळेतील ४ मुले सध्या पोलीस मध्ये आहे. एक विद्यार्थी एमपीएससी पास होऊन अधिकारी झाला आहे.

महारांजाचे बंधू हि शाळा चालवितात. सकाळी ७ ते रात्री ८ पर्यंत ते शाळाच बघतात. आणि एक बंधू शेतीचे काम करतो. अश्या प्रकारे त्यांनी काम वाटून घेतलेले आहे. आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका.