ब्लॉग

भाजपचं चिन्ह कमळच का? वाचा भाजपच्या चिन्हाचा मजेशीर इतिहास

‘राजकीय प्रतिके’ ही राजकीय पक्ष आणि नेत्यांचा आत्मा असतात. अगदी झेंड्याच्या रंगावरूनही पक्षाच्या बदलत्या भूमिका स्पष्ट होतात ( राज ठाकरेंनी बदललेला पक्षाचा अधिकृत झेंडा) एवढंच काय तर बॅनर्स, चिन्ह, उद्घोषणांचा ही राजकारणात डोळे उघडे ठेवून अर्थ काढला जातो. भारतीय राजकारणात प्रत्येक पक्षाला विशिष्ट चिन्ह दिलं जातं. या चिन्हावरूनच पक्षाची ओळख आणि राजकीय भूमिका ठरत असते.

महाराष्ट्रात काँग्रेस, भाजप आणि राष्ट्रवादी या राष्ट्रीय पक्षांचा तर शिवसेना आणि मनसे या प्रादेशिक पक्षांचा विशेष दबदबा आहे. या पक्षांच्या इतिहासाला जशी परंपरा आहे, अगदी तेवढीच या राजकीय चिन्हांना आहे. भारतीय जनता पक्ष हा 2014 च्या लोकसभा निवडणुकीत बहुमतानं लोकसभेत विजयी ठरला. सहा वर्षांच्या काळातच भारतातील सर्व राज्यातही पक्षाची विजयाची घोडदौड सुरूच आहे.

डाॅ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी भारतीय जनसंघाची स्थापना केली. काँग्रेसच्या धर्मनिरपेक्ष राजकारणाला शह देण्यासाठी हिंदू राष्ट्रवाद हा या पक्षाचा मूळ पाया होता. या भारतीय जनसंघाच अधिकृत चिन्ह ‘दिवा’ होता. दिवा हे चिन्ह हिंदू संस्कृतीच प्रतिक मानलं होय. भारतीय जनसंघातूनच भाजपची स्थापना झाली. दिव्याच्या तेजोमय प्रकाशातूनच भाजपला सत्ता प्राप्त झाली, असा विश्वास भाजप कार्यकर्ते व्यक्त करताना दिसून येतात.

आणीबाणीच्या पार्श्वभूमीवर भारतीय राजकारण फारच बदलून गेले. काँग्रेसच्या विरोधात जनतेचा सूर होता. राजकीय संधी साधून विरोधकांना एकत्र येणं महत्वाचं वाटल. भारतीय जनसंघाने या काळात इतर पक्षांची युती केली. राजकीय भूमिका थोडीशी बदलताना पक्षाचं चिन्हही बदलून गेलं. इंदिरा गांधींना आणीबाणीनंतरच्या निवडणूकीत शह देण्यासाठी भारतीय लोक दल, समाजवादी पार्टी आणि काँग्रेस (ओ) यांच्याशी युती करताना भारतीय जनसंघाचे नाव ‘जनता पक्ष’ झाले. पक्षाचे चिन्ह बदलून नांगरधारी शेतकरी आले.

काही वर्षातच हिंदूत्ववादाचा अजेंडा ही भाजपची मुख्य राजकीय भूमिका ठरली. तेव्हा पक्षाचे नाव भारतीय जनता पक्ष करण्यात आले, आणि ‘कमळ’ हे पक्षाचे अधिकृत चिन्ह करण्यात आले. या चिन्हाचाही मजेशीर इतिहास समोर आला आहे.

गोष्ट १८५७ ची. भारताचा स्वातंत्र्यसंग्रामाची ही पहिली ठिणगी समजली जाते. यादरम्यान कमळाच्या बीयांचा उपयोग संदेश पोहचविण्यासाठी केला जात असे. गाईच्या चरबीपासून काडतुसे बनवण्याचा निषेध करण्यासाठी हा विद्रोह करण्यात आला होता. हिंदू धर्म आणि परंपरांच्या रक्षणासाठी हा लढा महत्वपूर्ण ठरला. या काळातील प्रतिक म्हणून कमळं चिन्ह पक्षाचं अधिकृत चिन्ह म्हणून घेण्यात आल्याच बोललं जातं.

Topics