मनोरंजन

रिंकू राजगुरुनं शेअर केला हॉट लूक; लाईक करायला उडाली चाहत्यांची झुंबड

अभिनेत्री रिंकू राजगुरु सोशल मीडियावर खूप सक्रीय असते. लॉकडाऊनमध्ये तिचं काय सुरू आहे, तिचे अपकमिंग प्रोजेक्ट्स यासंदर्भात ती नेहमीच काहीना काहीतरी शेअर करत असते. तिचे इन्स्टाग्रामवर देखील अनेक फोटो आहेत जे काही वेळातच व्हायरल झाले आहेत.

रिंकूने तिच्या इन्स्टाग्रामवर असाच एक बोल्ड फोटो शेअर केला आहे. अल्पावधीतच प्रसिद्धी मिळालेल्या रिंकूचा हा बोल्ड लुक सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

रिंकूच्या चाहत्यांनी यावर अनेक कमेंट्स केल्या आहेत. बोल्ड, ब्युटीफूल आणि कडक अशा काही कमेंट्स तिच्या या लुकवर पाहायला मिळाल्या आहेत.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी रिंकूची ‘हंड्रेड’ ही हिंदी वेबसीरिज रिलीज झाली आहे. त्यामध्ये देखील रिंकूने तिच्या सहज सुंदर अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली आहेत.