आरोग्य

अहोरात्र कर्तव्यावर असलेल्या पोलिसांसाठी फिरता दवाखाना खासदार श्रीकांत शिंदे व वनरुपी क्लिनीकच्या माध्यमातून सुरु.

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन व वनरुपी क्लीनिक्सच्या माध्यमातून पोलिसांसाठी फिरता दवाखाना सुरु.कोरोनाची लागण पसरू नये यासाठी देशभरात लॉकडाऊन व संचारबंदी आहे. यावेळी अहोरात्र कर्तव्य बजाविणा:या पोलिसांच्या आरोग्याची हेळसांड होत आहे. त्यांनाही कोरोनाची लागण होऊ शाकते. त्यासाठी त्यांची तपासणी होणो आवश्यक आहे. त्यासाठी कल्याणचे शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकारने फिरता दवाखाना आजपासून सुरु करण्यात आला आहे. या फिरत्या दवाखान्याच्या माध्यमातून कर्तव्य बजावित असलेल्या पोलिसांची तपासणी केली जाणार आहे.
ठाणे शहरापासून हे तपासणी सुरु करण्यात आली आहे. दोन पथके कार्यरत राहणार आहे. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन व वनरुपी क्लीनिक्सच्या माध्यमातून हा फिरता दवाखाना सुरु करण्यात आला आहे. थर्मल स्कॅन मशीनच्या माध्यमातून शरीरातील तापमानाची चाचणी केली जाणार आहे. आजच्या पहिल्याच दिवशी ठाण्यातील नितीन कंपनीनजीक बंदोबस्तासाठी असलेल्या दोन पोलिसांच्या शरीराचे तापमान जास्त असल्याचे तपासणीतून दिसून आले. त्याना चाचणीसाठी रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. दोन तपासणी पथके ठाणे ते अंबरनाथ दरम्यान सर्व शहरांसह ग्रामीण भागात बंदोबस्ताला असलेल्या पोलिसांची तपासणी करणार आहेत अशी माहिती खासदार शिंदे यांनी दिली आहे.