आरोग्य

कुळगाव बदलापूर शिवसेना शहरप्रमुख व माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांच्या कडून हॉस्पिटलमधील मधील डॉक्टरांना P.P.E. किटचे वाटप.

कुळगाव बदलापूर शिवसेना शहरप्रमुख व माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांच्या कडून हॉस्पिटलमधील मधील डॉक्टरांना P.P.E. किटचे वाटप.
कोरोनाची लागण पसरू नये यासाठी देशभरात लॉकडाऊन व संचारबंदी आहे. यावेळी अहोरात्र कर्तव्य बजावणाऱ्या डॉक्टर्स त्यांनाही कोरोनाची लागण होऊ शाकते. रुग्णाची तपासणी करीत असताना डॉक्टर्स ने सुद्धा स्वतःची काळजी घेणे गरजेचे आहे. त्यासाठी शिवसेसेनेचे शहरप्रमुख वामन बारकू म्हात्रे यांच्या पुढाकाराने बदलापूर शहरातील कु.ब.न.प.दुबे रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय ममता हॉस्पिटल, सेवन पालम हॉस्पिटल, छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटल, मॅट्रिक्स हॉस्पिटल आणि आशिर्वाद हॉस्पिटल व अन्य हॉस्पिटलमधील मधील डॉक्टरांना पीपीई किट्स, विविध प्रकारचे मास्क,हँडग्लोवस यांचे वाटप करण्यात आले.
तसेच कोरोनाच्या प्रतिबंधासाठी राज्यामध्ये पुरेशा प्रमाणात साधनसामुग्री उपलब्ध आहे. मात्र आपातकालीन स्थिती ओढावल्यास खबरदारीचा उपाय म्हणून केंद्र शासनाकडे सव्वा तीन लाख पीपीई किट्स,नऊ लाख एन ९५ मास्क आणि ९९ लाख ट्रिपल लेअर मास्कची मागणी वामन म्हात्रे यांच्या वतीने आरोग्य विभागाकडे करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी देखील सादर मागणीची दखल घेतली जाईल असे आश्वासन दिले आहे.