बातम्या

कोकणातील अडचणीत सापडलेल्या नागरिकांना आवश्यक मदत मिळण्यासाठी आमदार निरंजन डावखरेंचा मदतीचा हात.

कोरोना विषाणूचा मोठ्या प्रमाणावरील प्रार्दुभाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी `लॉकडाऊन’ जाहीर केला. या काळात कोकणातून मुंबई-ठाण्यात कामानिमित्ताने शेकडो नागरिक आले होते. त्यांचा गावी परतीचा मार्ग बंद झाला. तर शहरात नोकरीनिमित्ताने एकटेच राहणाऱ्या कोकणवासीयांचेही हाल होत आहेत. अशा अडचणीत सापडलेल्या नागरिकांसाठी कोकण पदवीधर मतदारसंहाचे आमदार निरंजन डावखरे यांनी मदतीचा हात पुढे केला आहे. अडचणीत सापडलेल्या नागरिकांना कार्यकर्ते व स्वयंसेवकांकडून आवश्यक ती मदत पुरविण्यात येईल असे डावखरे यांनी सांगितले.
खाली दिलेल्या फॉर्ममध्ये गरजूंनी आपली माहिती भरावी जेणेकरून योग्य व्यक्तींपर्यंत मदत पुरविण्यात असे आवाहन निरंजन डावखरे यांच्या वतीने करण्यात आले आहे.

About the author

Todays Live Team

Add Comment

Click here to post a comment