आरोग्य बातम्या

राज्याचे गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड सेल्फ क्वारंटाइन

वैद्यकीय तपासणीत ‘कोविड १९’ पॉझिटिव्ह आढळलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याच्या संपर्कात आल्यामुळं राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी स्वत:ला ‘होम क्वारंटाइन’ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्यासोबत अन्य काही लोकांनीही सेल्फ क्वारंटाइन केलं आहे. खुद्द आव्हाड यांनीही ‘होम क्वारंटाइन’च्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. मुंब्रा येथील एक वरिष्ठ पोलीस कर्मचारी करोना पॉझिटिव्ह आढळून आला आहे. जितेंद्र आव्हाड हे त्याच्या संपर्कात आलेले असल्यानं त्यांनीही ‘होम क्वारंटाइन’चा निर्णय घेतला आहे. काही पत्रकारही या पोलीस कर्मचाऱ्याच्या संपर्कात आले असल्याचं समजतं. त्यांनाही सेल्फ क्वारंटाइनचा सल्ला प्रशासनानं दिला आहे.