आरोग्य बातम्या

ठा.म.पा नगरसेवक श्री. भरत चव्हाण, रोटरी क्लब ऑफ ठाणे व तारामाऊली सामाजिक सेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने ठाण्यातील सर्व डॉक्टर्स व इतर कर्मचाऱ्यांना लागणारे मास्क, ग्लोव्हज व सॅनिटायझर चे वाटप

कोरोनाच्या विषाणूशी शास्त्रज्ञांपासून तर डॉक्टर, नर्स, पोलीस, प्रशासकीय यंत्रणा, आरोग्य सेवक असे अनेकजण रात्रं-दिवस दोन हात करत आहेत. या सगळ्या परिस्थितीमध्ये डॉक्टरांनी सुधा त्यांची काळजी घेणे आवश्यक आहे, यासाठीच नगरसेवक श्री. भरत चव्हाण, रोटरी क्लब ऑफ ठाणे व तारामाऊली सामाजिक सेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने ठाण्यातील सर्व डॉक्टर्स व इतर कर्मचाऱ्यांना लागणारे मास्क, ग्लोव्हज व सॅनिटायझर ठा.म.पा. वैद्यकीय अधिकारी श्री. अनिरुद्ध मालगावकर यांच्या कडे सुपूर्द केले तसेच ठाणे पूर्व येथे विविध भागांमध्ये अति गर्दी असलेल्या भागांमध्ये जंतुनाशक फवारणी करण्यात आली. अशा परिस्थितीत शिस्त पाळणं, एकमेकांना सहकार्य करणं, गर्दी टाळणं आवश्यक आहे. जगण्यासाठी दररोज लागणाऱ्या भाज्या, दूध, किराणा आणण्यासाठी कोणतीही बंदी नाही, पण शिस्त मात्र आवश्यक आहे, असे आवाहन यावेळी श्री भरत चव्हाण यांच्या वतीने नागरिकांना करण्यात आले. यावेळी रोटरी क्लब ऑफ ठाणे यांच्या वतीने सी ए श्री. सतीश माने व सुधा शंकरनारायण उपस्थित होते.