राजकीय

राज्यावरच्या अर्थिक संकटाचे परिणाम दीर्घकाळ जाणवतील- शरद पवार

मुंबई | कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे सध्या देशात लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे शासनाच्या महसूलाच्या वाटाही बंद झाल्या आहे. अशा परिस्थितीत राज्य मोठ्या आर्थिक संकटात सापडलं आहे. अशातच राज्यावरच्या अर्थसंकटाचे परिणाम दीर्घकाळ जाणवतील, असा अंदाज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी वर्तवला आहे,

शरद पवार यांनी आज फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून महाराष्ट्राशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कोरोना, कोरोनामुळे शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी तसंच बंद असलेले उद्योगधंदे, आणि राज्याची विस्कटलेली आर्थिक घडी यावर विस्तृत्वपणे भाष्य केलं.

लॉकडाउनमुळे उद्योग बंद आहेत. कामगारांची जबाबदारी आणि वाढणारं कर्ज तसंच या काळात शून्य उत्पादन अशा संकटात सर्वच क्षेत्रे आहेत. त्यामुळे कोरोनामुळे राज्यावर अर्थसंकट आलेलं आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात बेकारी आणि बेरोजगारी वाढणार आहे. हे करोनाचे परिणाम एक ते वर्ष जाणवतील, असं पवार म्हणाले.

दरम्यान, लॉकडाउन 3 मे पर्यंत वाढवण्यात आला आहे. त्यामुळे पंतप्रधानांनी केलेल्या सूचनांचं पालन करणं ही आपली जबाबदारी असल्याचं पवार म्हणाले.

About the author

Todays Live Team

Add Comment

Click here to post a comment

Featured