राजकीय

कोरोना रुग्णाचे नाव जाहीर करणाऱ्या मंत्री जितेंद्र आव्हाडांवर गुन्हा दाखल करणार का?

राज्य सरकारच्या दुटप्पी भूमिकेकडे निरंजन डावखरेंनी वेधले लक्ष आहे.
ठाणे, दि. १६ (प्रतिनिधी) : कोरोनाचे रुग्ण म्हणून जितेंद्र आव्हाड व त्यांच्या मुलीचे नाव जाहीर केले, म्हणून `टाईम्स नाऊ’ वृत्तवाहिनीला गृह विभागाने नोटीस बजावली. मात्र, आयबीएन लोकमत वाहिनीवरील कार्यक्रमात कोरोनाचे रुग्ण असलेल्या ठाण्यातील पत्रकाराचे नाव जाहीर केल्याबद्दल गृह खाते जितेंद्र आव्हाडांवर गुन्हा दाखल करणार का, असा सवाल करीत भाजपचे आमदार निरंजन डावखरे यांनी राज्य सरकारच्या दुटप्पी भूमिकेकडे लक्ष वेधले आहे. त्याचबरोबर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्याकडे ई-मेलने पत्र पाठवून केली आहे.

जितेंद्र आव्हाड यांची मुलगी स्पेनहून ठाण्यात परतली आहे. याविषयासंदर्भात `टाईम्स नाऊ’ वाहिनीने जितेंद्र आव्हाड व त्यांची मुलगी पॉझिटिव्ह असल्याचे वृत्त प्रसारित केले होते. कोरोनाच्या रुग्णाचे नाव जाहीर केले, या आरोपावरुन गृह विभागातर्फे पोलिसांनी टाईम्स नाऊला नोटीस बजाविली. त्यापूर्वी गृह मंत्री अनिल देशमुख यांनीही कारवाईचे संकेत दिले होते.
काही दिवसांपूर्वी जितेंद्र आव्हाड यांनी आयबीएन लोकमत वरील कार्यक्रमात कोरोनाची लागण झालेल्या पत्रकाराच्या नावाचा उल्लेख केला होता. कोरोनाच्या रुग्णाचे नाव जाहीर करण्याचा गुन्हा आव्हाड यांनीही केला. मात्र, अद्यापि त्यांच्यावर कारवाई झालेली नाही वा त्यांना नोटीसही बजाविण्यात आलेली नाही. त्यामुळे गृह विभागाकडून दुटप्पी भूमिका घेतली जात आहे, असा आरोप आमदार निरंजन डावखरे यांनी केला आहे. या प्रकरणी आव्हाड यांच्यावर कारवाईची मागणीही पोलिस आयुक्त फणसाळकर यांच्याकडे आमदार डावखरे यांनी केली आहे.

About the author

Todays Live Team

Add Comment

Click here to post a comment

Topics