विशेष घडामोडी

माजी पंतप्रधान आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते मनमोहन सिंग यांना दिल्लीच्या एम्समध्ये दाखल करण्यात आले आहे.

डॉ. मनमोहन सिंग हे कार्डिओथोरॅसिक वॉर्डमध्ये निरीक्षणाखाली आहेत, अशी माहिती पीटीआयच्या वृत्तसंस्थेने सूत्रांनी दिली आहे.

रविवारी सायंकाळी मनमोहन सिंग यांच्या छातीत दुखू लागल्यानंतर त्यांना रुग्णालयात हलविण्यात आले.

सायंकाळी ८:४५ च्या सुमारास अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था AIIMS (एम्स) मधील हृदयरोगतज्ज्ञ डॉ नितीश नाईक यांच्या निदर्शनाखाली त्यांना हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले आहे.